मिरा-भाईंदर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसला असून विद्यमान सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नगरसेवकांचा सत्कार करून त्यांना शिवबंधन बांधले.
यामध्ये काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि मनसेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. तर या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
येत्या ऑगस्ट महिन्यात मीरा भाईंदरमध्ये महापालिकेच्या निवडणुका असल्यानं काँग्रेस-राष्ट्रावादीला हा मोठा झटका मानला जात आहे. रवींद्र माळी (राष्ट्रवादी) वंदना चके (राष्ट्रवादी) सुहास रकवी (काँग्रेस) हरिश्चंद्र म्हात्रे, (काँग्रेस) सलीम शेख (काँग्रेस) अरुण कदम ( मनसे) या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
COMMENTS