शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना मीडियाशी न बोलण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणी खासदार गायकवाड यांना उद्धव ठाकरे यांनी फक्त समज देऊन सोडलं असल्याची माहिती असून सार्वजनिक ठिकाणी गायकवाड यांनी वर्तन चांगलं ठेवावी अशी समज दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस तपास सुरु असे पर्यंत पक्ष गायकवाड यांच्यावर सध्यातरी कोणतीही कारवाई करणार नाही.
या प्रकारावर रवींद्र गायकवाड यांच्याकडे उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण मागितलं आहे. परंतु अजून लेखी स्वरुपात गायकवाड यांनी सादर केलं नसून त्यांनी आपली बाजू फक्त पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे.
रवींद्र गायकवाड हे ससंसदेचे खासदार असून पक्षाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. ते पक्षाचे सचिव किंवा शाखाप्रमुख नाहीत, त्यामुळे त्यांना पदावरुन पायउतार होण्यास सांगू शकत नाही. त्यामुळे पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना पक्षातून निलंबित करु शकत नाही. सध्याच्या घडीला आम्ही फक्त त्यांना समज देऊ शकतो आणि वर्तनाकडे लक्ष देण्यास सांगू शकतो, असं पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं आहे .
COMMENTS