मीरा भाईंदरमध्ये भाजपला मतदान करायला सांगणारा जैन मुनी हा दहशतवादी – संजय राऊत

मीरा भाईंदरमध्ये भाजपला मतदान करायला सांगणारा जैन मुनी हा दहशतवादी – संजय राऊत

मुंबई – मीरा भाईंदरमधील निकालावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. मीरा भाईंदरमधील भाजपचा विजय हा मुनी आणि मनीचा विजय असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. मीरा भाईंदरमध्ये जैन मतदारांना भाजपला आवाहन करणारे जैन मुनी यांच्यावरही राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. या जैन मुनीच्या मनात महाराष्ट्राविषयी द्वेष आहे. त्याला संपत्तीचा माज आहे. तो मुनी नसून राजकीय गुंड आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक स्थर्याला धोका आहे असंही राऊत म्हणाले. जैन मुनी हा झाकीर नाईकसारखा दहशतवादी असल्याची टीकाही राऊत यांनी केली.

एका जैन धर्मगुरूने धार्मिक मुद्द्यावरुन एखाद्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करणे म्हणजे आचारसंहिता भंग आहे असं सांगत त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्याचं राऊत यांनी सांगितलं. तसंच धर्माच्या नावावर प्रचार करुन निवडूण आलेल्या नगरसेवकांची नगरसेवक पदे रद्द करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS