मीरा भाईंदर महापालिकेसाठी आज सकाळी 10 वाजलेपासून मतमोजणी सुरू होत आहे. दुपारीपर्यंत महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकतो ते समजणार आहे. काल झालेल्या निवडणुकीत सरासरी 47 टक्के मतदान झाले आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या 24 प्रभागांतील 94 जागांसाठी मतदान झाले. एक जागेवर आधीच काँग्रेसच्या उमेदवाराचा बिनविरोध विजय झाला आहे.
राज्यात सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि शिवसेना तसंच विरोधातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही स्वबळावर निवडणुक लढवत आहेत. भाजप शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. मनसे इतर छोटे मोठे पक्ष आणि काही अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
एकूण जागा – 94
विविध पक्षांचे किती उमेदवार रिंगणात आहेत ?
भाजप आणि आरपीआय ( आठवले ) – 89
शिवसेना – 93
काँग्रेस – 74
राष्ट्रवादी – 67
अपक्ष – 104
गेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल
भाजप – 29
शिवसेना – 14
राष्ट्रवादी – 27
काँगेस – 19
COMMENTS