“मी पक्षात नाराज, पण भाजपमध्ये जाणार नाही”

“मी पक्षात नाराज, पण भाजपमध्ये जाणार नाही”

शिवसेनेचे अणुशक्तीनगरचे आमदार तुकाराम काते हे पक्षावर नाराज आहे. त्यामुळेच त्यांनी परवा गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रीत केलं. त्यामुळे ते भाजपची वाट धऱणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिलाय. पक्षात मी नाराज आहे. मात्र शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसैनिक आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाणार नाही असं काते म्हणाले. एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काते यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

 

माझ्या मतदारसंघातली कामे शिवसेनेच्या मंत्र्यांना सांगूनही होत नाही. मुख्यमंत्री  मात्र ही कामे करतात. त्यामुळे मी  त्यांना गणपतीच्या दर्शनाला बोलावले. त्याच वेळी मी शिवसेनेच्या मंत्र्यांनाही बोलावले होते. मात्र कुणीच फिरकले नाही. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्याही घरी मुख्यमंत्री गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. तेंव्हा तेही भाजमध्ये जाणार असा त्याचा अर्थ होतो का ? असा सवालही काते यांनी केला आहे.

COMMENTS