मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमधून थेट जनतेशी दर महिन्याला संवाद साधतात. तो फॉर्म्युला हिट ठरल्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही आता मी मुख्यमंत्री बोलतोय अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या कार्यक्रमातून मुख्य्मंत्री जनतेने विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे देणार आहेत. त्याचा पहिला भाग येत्या रविवारी सह्याद्री वाहिनीसह इतर काही मराठी वाहिन्यांवर प्रक्षेपीत केला जाणार आहे.
सध्या शेतक-यांच्या कर्जमाफीमुळे राज्याचं राजकारण तापलेलं आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आपल्या या पहिल्या डिजीटल जनता दरबारमध्ये शेतक-यांच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. त्यासाठी शेतक-यांकडून प्रश्न मागवण्यात आले आहेत. वॉट्सअवर सध्या तब्बल 18 हजार शेतक-यांनी प्रश्न विचारले आहेत. तर 1250 शेतक-यांनी ईमेल द्वारे प्रश्न विचारले आहेत. त्यातील ठरवीक आणि निवडक प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत.
COMMENTS