मुंबई – तुम्ही दिलेलं आव्हान मी स्वीकारतो, मी सीमेवर जाण्यास तयार असून हल्ला करण्यासाठी मला शस्त्र उपलब्ध करून द्यावीत, असं पत्र लिहून मनसेचे सचिव इरफान शेख यांनी केद्रीय मंत्री रामदास आठवलेंना प्रत्युत्तर दिलंय.
आपण स्वतः सीमेवर मला सोडण्यास यावे, ज्या देशात राहता, त्या देशाच्या रक्षणासाठी लढा, ही शिकवण माझ्या धर्मानं दिलीय. त्यामुळे तुमचं आव्हान मी स्वीकारतो, असंही त्यांनी पत्रात नमूद केलंय.
एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिकांनी फेरीवाल्यांविरोधात खळ खट्याक सुरु केले. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड करत त्यांना हुसकावून लावले होते. दरम्यान, गरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करण्याऐवजी मनसे कार्यकर्त्यांनी सीमेवर जाऊन लढावं, असं रामदास आठवलेंनी म्हटलं होतं.
COMMENTS