बीड – राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राजकारणाच्या मैदानावर एकमेकांना अडचण आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र मुंडे कुटुंबियांच्या मुळ परळी तालुक्यातील नाथ्रा या गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीत मात्र एक वेगळच चित्र पहायला मिळालं.
नाथ्रा ग्रामपंचायतीची निवडणूक पुढच्या महिन्यात होणार होती. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र गावक-यांनी निवडणुकीत होणारी पैशांची उधळपट्टी, एकमेकांचे वैर, भांडणं या सर्वांना फाटा देत चक्क निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. बोलणी झाली आणि सरपंचपदी धनंजय यांच्या गटाच्या कमलबाई माणिकराव मुंडे या बिनविरोध निवडूण आल्या. तर 9 सदस्यांपैकी 5 सदस्य हे धनंजय यांच्या गटाचे तर 4 सदस्य हे पंकजा यांच्या गटाचे बिनविरोध निवडूण आले.
राज्याच्या राजकारणात एमेकांचे विरोधक असले तरी गावात राजकारण नको अशी गावक-यांनी भूमिका घेतली. अर्थात या निर्णयला त्यांच्या नेत्यांचा होकार होताच हे वेगळं सांगायला नको. याचा आदर्श इतर ग्रामपंचायतींमध्येही घ्यायला हरकत नाही.
COMMENTS