मुंबई – काल मुंबई पडलेल्या मुसळधार पावसानंतर प्रशासन व व्यवस्था पुरासारख्या संकटाशी लढण्यात किती अपुरी पडते याचं चित्र स्पष्ट झालं आहे. यावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी महापालिका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
‘कालच्या परिस्थितीला महापालिका सत्ताधारी आणि पहारेकरी भाजपा दोन्ही जबाबदार आहे. हजारो कोटी रुपयांची कामे केली पण काय अवस्था हे काल दिसलेच. उद्धव ठाकरे म्हणत होते पाणी तुंबणार नाही पण काल काय झाले? मुंबईकरांच्या मदतीला मुंबईकर येतो, फक्त शिवसेना नाही हेच काल दिसले.’ असे धनंजय मुंडे म्हणाले.
हायकोर्ट माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्ष खाली समिती गठीत करून चौकशी करावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. ‘मुंबईकरांचा बीएमसीवर भरोसा नाय हेच काल दिसले.’ असे मुंडे म्हणाले.
COMMENTS