अनधिकृतरित्या सुरु असलेल्या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई कडून करण्यात आले आहे. बृहन्मुंबई या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील 13 माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरु आहेत. या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असं आवाहन करण्यात आले आहे.
अनधिकृत शाळांची नावे पुढीलप्रमाणे :
नारायणी ई-टेक्नो स्कूल, अंधेरी पूर्व, (इ.९ वी व १० वी), मॉडर्न हायस्कूल, अंधेरी पूर्व (इ.९ वी व १० वी), यंग इडियन स्कूल, जोगेश्वरी (पु), (इ.९ वी) आदर्श विद्यालय, गोरेगाव पश्चिम (इ.९ वी व १० वी), एतमाद इंग्लिश हायस्कूल, मोतीलालनगर, गोरेगाव (प.) (इ.९ वी व १० वी),बिलवर्ड स्प्रिंग स्कूल, जोगेश्वरी (पु), (आयजीएससीई), ओमसाई विद्यामंदिर हायस्कूल, मालाड पश्चिम (इ.९ वी व १० वी),विद्याभूषण हायस्कूल दहिसर (पु.) (इ.९ वी व १० वी), शिवशक्ती एज्युकेशन ट्रस्ट (इ.९ वी व १० वी), तावीद इंग्रजी स्कूल (इ.९ वी व १० वी), सेंट मारिया हायस्कूल (इ.९ वी ते १० वी), साई अॅकेडमी इंग्लिश स्कूल (इ.९ वी व १० वी), ब्राईट लाईट इंग्लिश स्कूल (इ.९ वी व १० वी).
COMMENTS