देशभरात जीएसटी विषयी व्यापाऱ्यांच्या मनात गोंधळाची स्थिती असताना मुंबईतील एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. मनीष खूबचंद मेहता असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. जीएसटीच्या धसक्याने राहत्या इमारतीच्या 17 व्या मजल्यावरून उडी मारून या व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे.
मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील ऑक्टा क्रेस्ट सोसायटीत मनीष खूबचंद मेहता राहत होते. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते जॉगिंगला गेले. यानंतर परत येताना त्यांनी दूध आणले आणि ते किचनमध्ये ठेवले. यानंतर ते घरातील बाल्कनीमध्ये गेले. येथून त्यांनी काही कळण्यापूर्वीच खाली उडी मारली. जागीच त्यांचा मृत्यू झाला.
मनीष मेहता यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. त्यांनी आपल्या व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यांचा व्यवसाय हा पावसाळ्यात ठप्प झाला होता. त्यातच १ जुलै पासून देशात जीएसटी लागू झाल्याने ते अस्वस्थ होते. अन्य व्यापाऱ्यांप्रमाणे ते सुद्धा जीएसटीमुळे चिंतीत होते. जीएसटीचा परिणाम आपल्या व्यवसायावर होणार अशी भीती त्यांना होती. यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे.
COMMENTS