मुंबईत होणार जगातील सर्वात उंच इमारत – नितीन गडकरी

मुंबईत होणार जगातील सर्वात उंच इमारत – नितीन गडकरी

मुंबई – जगात सर्वात उंच इमारत म्हणून दुबईतील बुर्ज खलीफा ही इमारत ओळखली जाते. बुर्ज खलीफा  या इमारतीमध्ये 163 मजले आहेत. या इमारतीची उंची 829.8 मीटर इतकी आहे. यापेक्षाही उंच इमारत मुंबईमध्ये बांधणार असल्याचं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय. जगातील या सर्वात उंच इमारतीला छत्रपती शिवाजी महाराज टॉवर असं नाव दिलं जाईल असंही गडकरी यांनी सांगितलं. मुंबईतील या प्रस्तावीत जगातील सर्वात उंच इमारतीपर्यंत पोहचण्यासाठी मरीन ड्राईव्ह पेक्षा जास्त तिप्पट मोठा रस्ता बनवला जाणार आहे.

या बिल्डिंगमध्ये पहिले 30 मजले हे कॉन्व्हेश्नल सेंटरसाठी, पुढचे 30 मजले हे रेस्टॉरंटसाठी, त्यानंतरचे 30 मजले हे हॉटेलसाठी आणि वरचे 20 मजले हे मॉलसाठी राखीव असतील. याशिवाय अनेक मजले या इमारतीमध्ये असतील, तसंच अंडरग्राऊंड मजलेही असतील, त्यामध्ये पार्किंगची सोय केली जाणार आहे. बिल्डिंगमध्ये सर्वात वर आर्ट गॅलरी असेल. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे वस्तूसंग्रहालय असेल. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर ही भव्यदिव्य इमारत होणार आहे. या इमारतीचा संपूर्ण प्लॅन तयार असून आता केवळ मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे’, असेही गडकरी पुढे म्हणाले.

COMMENTS