मुंबई – पोटनिवडणुकीत मतदारांचा थंडा प्रतिसाद, मात्र दिवसभर राज्यपातळीवरील बडे नेते प्रभागात !

मुंबई – पोटनिवडणुकीत मतदारांचा थंडा प्रतिसाद, मात्र दिवसभर राज्यपातळीवरील बडे नेते प्रभागात !

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 116 च्या निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी मतदारांनी थंडा प्रतिसाद दिला असला तरी राजकीय गरमा गर्मी या प्रभागात पाहायला मिळाली.  कॉग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यंच्या निधनानंतर प्रभाग क्रमांक 116 मध्ये पोटनिवडणूक जाहीर होताच शिवसेना भाजपात घामासान सुरू झालं. आज झालेल्या पोटनिवडणुकीत अंदाजे 44 टक्के मतदान झालं आहे.
शिवसेनेतून आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपातून प्रमिला पाटील यांच्या सून जागृती पाटील यांना निवडणुकीचा रिंगणात  उतरवलं.  प्रचाराचा काळात दोन्ही पक्षाचे बडे नेते या मतदार संघात तळ ठोकून होते प्रचारादरम्यान या दोन्ही पक्षाचा कार्यकर्त्या मध्ये तुंबळ हाणामाऱ्या देखील झाल्या त्यामुळे आज मोठा पोलीस बंदोबस्त या प्रभागात ठेवला आला होता.
आज मतदान जरी शांततेत पार पडल असलं तरी राजकीय गरमागर्मी पाहायला मिळाली. येरवी कधीही न फिरकणारी नेते मंडळी या प्रभागात भर उन्हात गल्ली बोळातून फिरताना दिसली. भाजपातून खासदार किरीट सोमैय्या, राज्य मंत्री रवींद्र चव्हाण, गटनेते मनोज कोटक तर शिवसेनेकडून विनायक राऊत , एकनाथ शिंदे , आमदार सुनील राऊत प्रभागात दिवसभर तळ ठोकूण होते.
या निवडणुकीत राष्ट्रवादी, मनसेने आपले उमेदवार दिले नसल्यामुळे ही मतं कोणाचा पारड्यात जातात. हेही निकालाची दिश ठरवणार आहे. सर्वच पक्ष  विजयाचा दावा करत आहेत. मात्र मतदारांनी कोणाच्या पारड्यात विजयाचे दान टाकले हे उद्याच कळणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे.

COMMENTS