मुंबई – भांडूप पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना का हरली भाजप का जिंकले ?

 मुंबई – भांडूप पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना का हरली भाजप का जिंकले ?

मुंबई –  या ठिकाणी याच वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेच्या प्रमिला पाटील या विजयी झाल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं. फेब्रुवारीममध्ये शिवसेना दुसर-या क्रमांकावर होती. त्यामुळे भाजपला जागा जिंकण्यासाठी तगड्या उमेदवाराची आवश्यकता होती. दिवंगत नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या कुटुबिंयाचा प्रभाग 116 मध्ये चांगला होल्ड आहे. त्यामुळे भाजपनं खेळी करत पाटील दिवंगत नगरसेविकेच्या कुटुंबाला भाजपमध्ये प्रवेश देत प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील कुटुंबियांची हक्काची होटबँक आणि सहाभभूती याचा फायदा भाजपच्या जागृती पाटील यांना झाला.

भाजपचं नेहमीप्रमाणे निवडणूक मॅनेजमेंट चांगल होतं. त्याला पाटील कुटुंबियांचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांचा चांगला सपोर्ट मिळाला. प्रभागातील उत्तर भारतीय मतदारांनी मोठ्या प्रमाणात दान हे भाजपच्या बाजुने टाकले. तसंच दलित आणि इतर मराठी मतदार जो या प्रभागात शिवसेनचा मतदार होता तोही काही प्रमाणात भाजपच्या बाजुने वळाला. याचाही फायदा भाजपला झाला.

शिवेसनेचे आमदार अशोक पाटील यांच्याबद्दलची नाराजीही शिवसेनला भोवली. त्यातच पाटील यांनी पुन्हा त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनमध्ये नाराजी होती. त्यातून काही कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागले तर काहींनी मनापासून काम केलं नाही. प्रभागात कामे होत नसल्याच्या मतदारांच्या तक्रारी होत्या त्याचा फटका शिवसनेला बसला अर्थात त्याचा फायदा भाजपला झाला. इतर काही पक्षांनी भाजपला छुपी मदत केल्याचीची चर्चा प्रभागात आहे. त्यामुळे भाजपच्या भांडुपमधील विजय सुकर झाला.

पोटनिवडणुकीतही भाजपला स्वतःच्या पक्षाचा उमेदवार मिळाला नाही. इतर पक्षातून उमेदवार आयात करावा लागला. दिवंगत नगरसेविका प्रमिमा पाटील यांच्या मुलाला आणि सुनेला पक्षात घेऊन सुनेला उमेदवारी दिली. त्याच्या सहानभुतीचा फायदा घेत विजय मिळवावा लागला. ही परिस्थिती असताना दुसरीकडे शिवसेनेकही काही आलेबेल नाही. दुस-यांदा आमदाराच्या पत्नीचा मोठा पराभव स्विकारावा लागला आहे. त्याचंही शिवसेनेनं आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.

COMMENTS