मुंबई महापालिकेत हाणामारी, भाजप नगरसेवकाला बदडले, कपडेही फाडले, उद्धव, मुनगंटीवारांच्यासमोर पालिकेत तमाशा !

मुंबई महापालिकेत हाणामारी, भाजप नगरसेवकाला बदडले, कपडेही फाडले, उद्धव, मुनगंटीवारांच्यासमोर पालिकेत तमाशा !

मुंबई – जीएसटीचा फंड देण्याचा कार्यक्रम आज मुंबई महापालिकेत होता. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आले होते. त्यावेळी युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः हाणामीरी झाली. या हाणामारीत भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना शिवसैनिकांनी जोरदार चोप दिला. तसंच त्यांचे कपडेही फाडले. जोरदार घोषणाजीने कार्यक्रमाला गालबोट लागले. तेंव्हा कार्यक्रम सुरू असतानाच भाजपचे नगरसेवक कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर पडले. यावेळी जाऊ त्यांना आपण आहोत असं सांगत उद्धव ठाकरे यांनीही भाजपला टोला हाणला. उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर ही हाणामारी झाली.

 

COMMENTS