मुंबई पालिकेचीही इंटरनेट यंत्रणा सहा तास बंद
जगभरातील सायबर हल्ल्याचा फटका मुंबई महापालिकेतील जुन्या ‘विंडोज एक्स पी आॅपरेटिंग’ यंत्रणेलाही बसू नये यासाठी सोमवारी पालिकेच्या काही विभाागांतील इंटरनेट सेवा दिवसभर बंद ठेवण्यात आली. यामुळे पालिकेचे प्रशासकीय कामकाज दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठप्प झाले.
पालिकेचा सर्वाधिक ‘डाटा क्लाऊड सर्व्हिस’ आणि ‘लिनक्स आॅपरेटिंग सिस्टीम’वर असल्यामुळे त्याच्याशी संबंधीत सर्व कामे बंद पडली.
‘रॅन्समवेअर’ ने धुमाकूळ घातला असल्याने त्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट कॉपोर्रेशन’ने ‘पॅच’ हे ‘अँटी व्हायरस’ तात्काळ उपयोगात आणले आहे. पालिकेनेही ‘पॅच’ अपग्रेड करण्यासाठी इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे सहा तासांनंतर पालिकेची इंटरनेट सेवा सुरळीत झाली.
COMMENTS