मुंबई –  लालबागच्या राजा मंडळाला 4 लाख 86 हजार रुपयांचा दंड

मुंबई – लालबागच्या राजा मंडळाला 4 लाख 86 हजार रुपयांचा दंड

मुंबई – गणेशोत्सवात उत्सव मंडळांनी मंडपासाठी खोदलेल्या खड्डयांप्रकरणी महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दंडात्मक कारवाईची नोटीस जारी केली आहे. यामध्ये लालबागच्या राजा मंडळाला 243 खड्डे केल्याप्रकरणी 4 लाख 86 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. प्रत्येक खड्डयांसाठी महापालिकेने 2 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यासर्व गणेशोत्सव मंडळांना महापालिकेच्यावतीने तसेच पोलिसांच्यावतीने परवानगी देताना खड्डे न खोदण्याची अट घालण्यात आली होती. खड्डे खोदले गेल्यास ते त्वरीत बुजवले जावेत, अशाही प्रकारच्या अटीचा समावेश होता. जर हे खड्डे बुजवले न गेल्यास संबंधित मंडळाला प्रत्येक खड्डयांसाठी २ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. त्यानुसार एफ-दक्षिण विभागातील परळ, शिवडी, लालबाग व काळाचौकी आदी भागातील 13 मंडाळांना खड्डे खोदल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. यासर्व 13मंडळांकडून खड्डयाप्रकरणी 12 लाख 94 लाखांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

COMMENTS