मुंबई – मंबई विद्यापीठाची निकालाची 31 ऑगस्ट ही डेडलाईन गुरुवारी संपली तरीही निकालांचा अजूनही लागला नसल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत. यावर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी टि्वट करुन जोरदार टीका केली आहे. ‘ टेंडर काढलं, स्कॅनिंगवर वरेमाप खर्च केला, अत्याधुनिक संगणकांची खरेदी केली, भरपूर पैसा खर्च केला. पण तीन महिन्यात निकाल काही लागू शकला नाही. हा घोटाळा आहे की नाही, याची चौकशी कधी होणार?’ असा सवाल करत, ‘चौकशी क्लिन चीट हातात तयार ठेऊन नाही झाली तर उत्तम.’ असा टोला ही लगावला.
‘निकाल वेळेत लागावे म्हणून विद्यार्थी संघटनांना आंदोलन करण्याची लाज वाटू लागली आहे. पण विद्यापीठाला लाज वाटत नाही. त्यामुळे आता मुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी.’ असं आदित्य ठाकरे म्हणाले आहे.
मुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी. आंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण विद्यापीठाला नाही.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 1, 2017
हा घोटाळा आहे की नाही, ह्याची चौकशी कधी होणार? चौकशी, क्लीन चीट हातात तयार ठेऊन नाही झाली तर उत्तम…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 1, 2017
टेंडर काढून, पैसे देऊन, स्कॅनिंग वर खर्च करून, अत्याधुनिक कॉम्प्युटर्स वापरून निकाल काही ३ महिने लागू शकला नाही.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 1, 2017
COMMENTS