राज्यात मराठा आरक्षणाबाबत निघणारे मराठे मोर्चे आणि शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या गोटात वादळ उठले. मात्र, हे वादळ क्षमण्याचे नाव घेत नाही. विरोधकांनी शिवसेनेला खंडीत पकडण्याची संधी सोडलेली नाही. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार ‘प्रहार’ केलाय.
राणेंनी शिवसेनेला डिवचताना म्हटलंय, वृत्तपत्रात एखादी चूक झाली तर माफी मागण्यासाठी सुसंस्कृतपणा असावा लागतो. व्यंगचित्रासाठी उद्धव ठाकरे माफी मागण्यास तयार नसल्याने आता ‘सामना’तला शिपाई माफी मागणार आहे का, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित करीत शिवसेनेवर तोफ डागली.
COMMENTS