मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान आजपासून राजधानी भोपाळमध्ये उपासाला बसत आहेत. राज्यात सुख शांती नांदावी यासाठी ते हा उपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतक-यांचं आंदोलन सुरू आहे. विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यात शेतकरी आंदोलनकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 5 शेतक-याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शेतकरी आंदोलनाननं हिंसक वळण घेतलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना ही बुद्धी सुचली आहे. खरंतर गेली तीन टर्म शिवराजसिंह चौहान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या 15 वर्ष मध्यप्रदशातील जनता मोठा विश्वासाने त्यांना आणि त्यांच्या पक्षाला निवडूण देत आहे. आपला नेता आपल्यासाठी काही करेल या आशेवर जनता जगत आहे. खरंतर गेल्या 15 वर्षात आपण शेतक-यांचे किती प्रश्न सोडवलेय़ ?, सरकार कुठे कमी पडंल ?, शेतक-यांवर ही वेळ का आली ? याचं आत्मपरिक्षण त्यांनी करायला हवं. राज्यातला शेतकरी आजही शांत झालेला नाही. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं होत आहेत. ते आंदोलन शांत करणं, शेतक-यांचा राग कमी करणं हे राहिलं दूर आणि मुख्यमंत्रीसाहेबच अनिश्चित काळासाठी उपासाला बसले आहेत. त्यामुळे कारभार कोण करणार ? शेतक-यांचं दुःख दूर कोण करणार ? शेतक-यांची समजूत दूर कोण करणार ? असे प्रश्न पडले आहेत. तुम्हाला हेच जर करायचं आहे तर कारभार दुस-या कोणाकडे तरी सोपवा. दुसरा तरी शेतक-यांगी गा-हाणी ऐकूण घेईल. नाहीतर लोक म्हणतील मध्यप्रदेश जळत आहे आणि मुख्यमंत्री उपासाला बसले आहेत.
COMMENTS