मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नीतीशकुमारांना धक्का, जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर !

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नीतीशकुमारांना धक्का, जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर !

नितीशकुमार यांच्या भाजप सोबत जाण्याच्या निर्णयामुळे पक्षात फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पक्षाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद यादव आणि राज्यसभा खासदार अली अन्वर यांनी नितीशकुमार यांच्या या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जेडीयूमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. नीतीशकुमार यांनी भाजपसोबत जाण्याची खूपच घाई केली आहे. आम्हाला हा निर्णय मान्य नाही अशी प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांनी दिली आहे. जेडीयूमध्ये जवळपास यादव आणि मुस्लिम समाजाचे जवळपास 20 आमदार आहेत. हे आमदारही नीतीशकुमार यांच्या या निर्णयावर नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच हे आमदारही पक्षाबाहेर पडले तर नितीशकुमार यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय अंगलट येण्याची शक्यता आहे.

COMMENTS