मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षणाबाबत मराठा समाज राज्य सरकारसोबत चर्चेला तयार असल्याच्या निर्णयाचे राज्य शासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सकल मराठा समाजासोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच वेळ घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने नेमकी कुणाशी चर्चा करावी, हा मुद्दा वारंवार उपस्थित होत होता. आता सकल मराठा समाजाने स्वतःहून राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविल्याने समाजाच्या मागण्यांबाबत चर्चेची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे. सकल मराठा समाजाच्या या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
COMMENTS