कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री, शरद पवारांची दिल्लीत बैठक

कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री, शरद पवारांची दिल्लीत बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी 6 जनपथ येथे चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी चिथावणी देत असल्याचा आरोप केला होता. यामुळे राष्ट्रवादी पक्ष व भाजपमध्ये तणावाचे संबंध असताना या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे सुध्दा उपस्थित होते.  या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र अजित पवार हे उपस्थित राहिले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी पक्षाची अंतर्गत बैठक झाली होती.

आज राष्ट्रपतीपदाचा निवडणूक अर्ज भरण्याचा दिवस असल्याने राजधानीत राजकीय हालचालींना वेग आला असताना  मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

COMMENTS