चंद्रपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 16 ऑगस्टला चंद्रपूर जिल्हा दौ-यावर होते. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्याच्या निषेधाचे फलक लावले होते. त्याविऱोधात विक्रांत कोरेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन पोलिसोंनी चंद्रपूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतीश वारुरजकर, चिमुरचे नगरसेवक विनोद ढांकनकर यांच्यासह विलास मोहिणकर, राजेंद्र चौधरी, पप्पू शेख यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केवळ निषेधाचे फलक लावल्यामुळे गुन्हे दाखल केल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय.
COMMENTS