मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान पोलीस अधिकारी मेलानिया ट्रम्पचा फोटे पाहण्यात दंग

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान पोलीस अधिकारी मेलानिया ट्रम्पचा फोटे पाहण्यात दंग

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका जाहीर कार्यक्रमात पोलीस कर्मचारी मोबाईलवर कँडी क्रश खेळण्यात व्यग्र असल्याचे दिसून आले. तर काहीजण, हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचे फोटोज पाहत होते.

या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरामुळे पोलीस दलात कुजबूज सुरू झाली आहे. पाटणा येथे सोमवारी एका कार्यक्रमासाठी  नितीश कुमार आणि राज्याचे पोलीस महासंचालक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना संबोधित केले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणा दरम्यान पोलीस कर्मचारी मोबाइलवर गेम खेळत असल्याचे फोटोज प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहेत.

 

COMMENTS