मुख्यमंत्र्यांच्या लोकलमधील किस्स्यांनी विधानसभेत हास्यकल्लोळ

मुख्यमंत्र्यांच्या लोकलमधील किस्स्यांनी विधानसभेत हास्यकल्लोळ

राजकीय नेते कधी सार्वजनिक वाहनातून प्रवास करतात का?  नेत्यांना सामान्य जनतेचे दुःख काय कळणार आहे. अशी चर्चा सामान्य प्रवाशांमध्ये असते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सामान्य प्रवाशांप्रमाणे लोकलने प्रवास केला आहे. त्यांना आज लोकलमधील प्रवासाचे किस्से सभागृहात सांगीतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई लोकलमधील प्रवासाचे किस्से सांगीतले आणि  विधानसभेत हास्यकल्लोळ झाला. नगर विकास खात्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी आपल्या लोकल प्रवासाची आठवण जागी केली. त्यांनी स्वतःचा लोकल ट्रेनमधील प्रवासाचा अनुभवाचे कथन केले.

मुंबईमध्ये आल्यावर मी लोकल प्रवास करत असे. एके दिवशी सकाळी आठची वेळ असेल मी मीरा रोड स्थानकावर मुंबईकडे जाण्यासाठी थांबलो होतो. प्लॅटफॉर्मवर तीन-साडेतीन हजार लोक असतील, त्यावेळी लोकल प्लॅटफॉर्मवर स्थिरावण्याआधीच लोकल भरून गेली. मोठी लढाई करून मी आत शिरलो पण दादरला येईपर्यंत गर्दी कमी होत नव्हती.

“एकदा मी मीरा रोडवरून मुंबईला येत होतो. प्लॅटफॉर्मवर उभा होतो, ट्रेन  आली पण ट्रेन थांबायचा आत भरली, खूप लढाई करन मी ट्रेन मध्ये चढलो.. ट्रेन मध्ये दादर पर्यंत एवढी गर्दी होती की स्वतःचा हात खाजवायला गेलो तर दुसऱ्याच हात खाजवला जाईल इतकी गर्दी होती.. हात पाय कुठे होत हे कळत नव्हतं.. ” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकल ट्रेनमधील प्रवासाचा अनुभव सांगितला, आणि  विधानसभेत एकच हास्यकल्लोळ झाला.

यातून आता मुंबईकरांची सुटका होईल. मेट्रो मीरा भाईइंदरपर्यंत नेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर देताना दिले.

 

 

 

COMMENTS