मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा देऊन ज्योतिषी बनावे – सुप्रिया सुळे

मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा देऊन ज्योतिषी बनावे – सुप्रिया सुळे

अकोला –  ‘मुख्यमंत्र्यांना जर का एवढीच कुंडल्या बघण्याची आवड असेल तर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ज्योतिषी बनावे’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

सरकारविरोधी कुणी सूर काढला की मुख्यमंत्री त्यांना तुमची कुंडली आमच्याकडे आहे, असा धमकीवजा इशारा देतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषी बनावे’,असा सणसणीत टोला सुप्रिया सुळे यांनी  देवेंद्र फडणवीस यांना  लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघटनात्मक आढावा घेण्यासोबतच प्रतिष्ठित नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी त्या अकोल्यात आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील विविध जिल्ह्य़ातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्याकरिता मदत करण्यात येणार आहे. त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्चही आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. त्यामध्ये कोणत्याही अटी नकोत, असेही त्यांनी सांगितले.

 

COMMENTS