उस्मानाबादमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्यात आले. पारडी फाट्याजवळ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांना कर्जमाफी आणि दानवेच्या विरोधात युवक काँग्रेसकडून काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांना अडवून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.
दरम्यान, रावसाहेब दानवेंच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी या विधानाबाबत या दौऱ्यावेळी बोलण्यास चक्क नकार दिला.
COMMENTS