मुनगंटीवारांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी आमदारांचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ताफ्यावर काँग्रेस कार्यकर्तांनी कांदे, दूध, भाजीपाला फेकून निषेध केला. जिल्ह्यातील मोझरी येथे काल (गुरूवार) दुपारी दीड वाजता ही घटना घडली. कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाहनावर चढून आंदोलन केले,याप्रकरणी 9 कार्यकर्त्यावर तिवसा पोलिसांनी 341,143,135 कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली,या सर्व कार्यकर्त्यांचे कपडे काढून पोलिसांनी अट्टल गुन्हेगारा सारखी वागणूक देऊन पोलीस कोठडीत डांबले, या प्रकरणाची माहिती होताच काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर ,आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी तिवसा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत शेकडो कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले.
कार्यकरते काँग्रेसचे असले तरी ते शेतकऱ्यांची मुले असल्याने त्यांची तातडीने सुटका करावी अशी मागणी आमदार यशोमाती ठाकूर ,आमदार वीरेंद्र जगताप यांनी पोलीस ठाण्यातचं यहिया आंदोलन केले ,कार्यकत्यावर लावण्यात आलेले गुन्हे हे जामीनपात्र असल्याने ठाणेदाराने जमानत द्यावी अशी मागणी दोन्ही आमदारांची होती , राजकीय दबावाखाली सरकार काम करीत असून पोलीस यंत्रणेचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपन्याचा प्रयत्न सरकार करीत आहे असा आरोप होत आहे.
COMMENTS