‘मेक इन इंडिया’प्रमाणे ‘थिंक इन इंडिया’ही सुरु करा – पवार

‘मेक इन इंडिया’प्रमाणे ‘थिंक इन इंडिया’ही सुरु करा – पवार

भारती विद्यापीठाकडून  शरद पवार यांना डी लीट पदवी प्रदान

पुणे – मेक इन इंडियाबरोबर थिंक इन इंडिया मोहीमही सुरु करायला हवी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ते पुण्यात बोलत होते.

पुण्यात आज भारती विद्यापीठाचा 18 वा पदवीदान समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात पद्मविभूषण शरद पवार यांना डी लिट पदवी देऊन त्यांचं गौरव करण्यात आला.
खाजगी शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. संसदेतदेखील हा विषय आला होता. गरज असल्यास जरुर असे नियंत्रण आणावे. मात्र, त्यामुळे या शिक्षण संस्थांचा श्वास गुदमरणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, शिक्षण क्षेत्रात संख्यात्मक वाढ झाली पण गुणात्मक वाढ झालेली नाही, अशी खंत पवारांनी व्यक्त केली. त्यामुळेच मेक इन इंडिया बरोबरच थिंक इन इंडिया मोहीम सुरु करायला हवी असे पवार म्हणाले.

भारती विद्यापीठाचे कुलपती पंतगराव कदम आणि कुलगुरू शिवाजीराव कदम यांच्या हस्ते पवारांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी पवारांनी भाषणाच्या सुरुवातीला किशोरी आमोणकर यांचे स्मरण केले. संगीत क्षेत्रात किशोरी अमोणकर यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच त्यांना गानसरस्वती असे संबोधले जाते, अशा शब्दात पवार यांनी श्रद्धाजंली वाहिली. तसेच त्यांचे अवघा रंग एक झाला हे गाणे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, असेही पवारांनी यावेळी सांगितले.

 

COMMENTS