लोकपाल विधेयक सहा वेळा पटलावर आणलं पण पुढे काहीही झालं नाही, अशी खंत व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा लोकपालसाठी आंदोलनाची घोषणा केलीये. अण्णांनी आता थेट मोदी सरकारवर विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. अण्णा हजारेंनी पत्रकार परिषद घेऊन लोकपाल विधेयकासाठी दिल्लीत आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय.
पंतप्रधान माझ्या सारख्या सामान्य लोकांच्या पत्राला उत्तर देत नाही. मोदी म्हणाले होते, परदेशातला काळा पैसा परत आणणार, पण नोटबंदी करून सुद्धा देशातला कचरा ते परत आणू शकलेले नाहीत, मोदींच्या सरकारमध्ये भ्रष्टाचारात वाढ झाली आहे, अशी टीका अण्णांनी केली.
COMMENTS