कासाऊली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदी निर्णयावर कडाडून टीका कारणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अरूण शौरी यांनी पुन्हा हल्ला चढवला असून शौरींनी पंतप्रधान पदासाठी मोदींना पाठिंबा देऊन खूप मोठी चूक केली . असं शौरी म्हणाले आहेत.
ते खुशवंत सिंग साहित्य महोत्सवादरम्यान बोलत होते. मी दुसऱ्यांदा चूक केली आहे. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना जनता दल सरकारच्या काळात मी पाठिंबा देऊन चूक केली होती. तर आता तसेच काही मोदींबाबतही घडले आहे. भाजप आणि डाव्या पक्षांनी जनता दलाला बाहेरून पाठिंबा दिला होता.
ते आत काय करत आहेत, यापेक्षा ते अगोदर काय म्हणत होते, याचा विचार केला पाहिजे. जे दावे नेत्यांनी केले आहेत, त्याची नीट उलट तपासणी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
COMMENTS