दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत महाराष्ट्रातील खासदारांची बैठक बोलावली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या बैठकीमागचे नेमके कारण अजून समजले नसले तरी सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि रखडलेल्या प्रकल्पांचा मोदींकडून आढावा घेतल्याची माहीती पुढे येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा अशा प्रकारच्या सूचना पंतप्रधांनी खासदारांना दिल्याचं बोललं जातंय. सरकारच्या योजना मतदारांपर्यत पोचत नाही अशी नाराजीही पंतप्रधांनी व्यक्त केली. काही खासदारांच्या कामाचं कौतुक करत काहींना काम सुधारण्याचा सल्लाही मोदींनी दिलाय. सिंचन, स्वच्छता मोहीम, उद्योग या मुद्यांवर भर देण्याचा सल्लाही पंतप्रधांनी दिलाय. जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यासही पंतप्रधांनी खासदारांना सांगितलंय.
COMMENTS