मोदींनी 3 वर्षांत केले 56 परदेश दौरे

मोदींनी 3 वर्षांत केले 56 परदेश दौरे

दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परदेश दौ-यावरुन नेहमीच विरोधकांनी लक्ष केलं आहे. देशात थांबण्यापेक्षा मोदी हे सातत्याने परदेश दौ-यावर असतात असा विरोधकांचा आक्षेप आहे. त्याला दुजोरा मिळणारी आकडेवारी समोर आली आहे. नरेंद्र मोदीं पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 56 परदेश दौरे केल्याचं समोर आलंय. सरकारच्या वतीनंच काल लोकसभेत ही माहिती देण्यात आलीय. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांची माहिती दिली. मे २०१४ मध्ये मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. यानंतर जून २०१४ मध्ये त्यांनी सर्वप्रथम भूतानचा दौरा केला होता. मोदींनी चार वेळा अमेरिकेचा दौरा केला आहे. याशिवाय रशिया, जपान, अफगाणिस्तान, नेपाळ आणि चीनचा दोन वेळा दौरा केला.

COMMENTS