गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. यावरुन केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना पेट्रोल दरवाढीला कंटाळून तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी केलेले जुने ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याने मोदी सरकारवर टीका होत आहे. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमिताभ बच्चन यांनी पेट्रोल दरवाढीवरून तत्कालीन यूपीए सरकारवर केलेल्या ट्विट्सचा सहारा घेत हे जुने ट्विट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 2013 साली मे महिन्यात नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले त्यावेळी दिल्लीत पेट्रोलची किंमत 63.9 पैसे इतकी होती. तर अमिताभ बच्चन यांनी 24 मे 2012 रोजी ट्विट केले त्यावेळी पेट्रोलचे दर 7.5 रुपयांनी वाढले होते. त्यावर अमिताभ यांनी यूपीएवर टीका करणारे एक ट्विट केले होते. आता हे दोन्ही ट्विट सध्या व्हायरल होत आहेत.
2 जुलैपासून14 सप्टेंबरदरम्यान दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 63 रुपयांवरून 70 रुपये 39 पैशांवर पोहोचला आहे. म्हणजेच 7 रुपये 39 पैशांची दरवाढ झाली आहे. तर मुंबईत एक लीटर पेट्रोलची किंमत 74 रुपये 30 पैशांवरून 79 रुपये 50 पैशांवर पोहोचली आहे. मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरात इतकी मोठी वाढ झालेली असताना अमिताभ बच्चन आता बोलत का नाहीत?, असा सवाल सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
COMMENTS