भाजपच्या ‘मोदी मोदी’ गजराला शिवसेनेकडून ‘चोर है चोर है’ प्रतिसाद

भाजपच्या ‘मोदी मोदी’ गजराला शिवसेनेकडून ‘चोर है चोर है’ प्रतिसाद

आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते एसटी प्रणाली अंतर्गत मुंबई महानगरपालिकेला पहिला धनादेश  प्रदान करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हा 647.34  धनादेश सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमात सेना-  भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले. भाजप नगरसेवकांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या. तर त्याला उत्तर म्हणून शिवसेना नगरसेवकांनी ‘चोर है चोर है’ च्या घोषणा दिल्या.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शालेय शिक्षणमंत्री  विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, महापालिका आयुक्त यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित आहेत.

या कार्यक्रमासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर आहेत. त्यांच्याच समोर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याने, दोन्ही नेत्यांसमोर मोठी अडचणी निर्माण झाली. मुनगंटीवार यांनी  मनोगत व्यक्त केल्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे बोलण्यासाठी उभे राहिले असता, भाजप नगरसेवक थेट उठून निघून गेले.

 

 

 

COMMENTS