हैदराबाद – 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा चलनामध्ये कशाला हव्यात ? या नोटांची काय गरज आहे ? 100 आणि 200 रुपयांच्या नोटा दैनंदिन व्यवहारासाठी पुरेशा आहेत. असे मत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी व्यक्त करत. चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरचा आहेर दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करुन 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा नोव्हेंबरमध्ये चलनातून बाद केल्या. त्यानंतर 2 हजार रुपयांची नोटा चलनात आणल्या आता 500 रुपयांची नोटही पुन्हा चलनात आली आहे. जर मोठया नोटा पुन्हा चलनात येणार असतील तर, नोटाबंदीचा निर्णयाचा काय उपयोग? असा प्रश्न अनेक जाणकरांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नायडू यांचे हे मत म्हणजे मोदी सरकारला मोठी चपराकच म्हणावी लागेल.
COMMENTS