मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मेघालयातील भाजप नेत्याने बीफ पार्टीची घोषणा केली आहे. बीफ पार्टीचे आयोजन करण्याची घोषणा करणारे भाजप नेते बाचू चामबुगॉन्ग माराक यांना पक्षातून निलंबित केले जाण्याची शक्यता आहे. टेलीग्राफने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
उत्तर गारो हिल्सचे अध्यक्ष असलेल्या बाचू यांनी बुधवारी फेसबुकवर एक बॅनर पोस्ट केला होता. ‘गारो हिल्स भाजप नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होण्याचा आनंद साजरा करण्यासाठी बिची-बीफ पार्टीचे आयोजन करेल,’ असा मजकूर पोस्टवर लिहिण्यात आला होता. त्यामुळे गोमांसाबद्दल भाजपची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप यावरुन दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला जातो आहे.
दरम्यान, आठवडी बाजारात हत्येसाठी दुभत्या आणि भाकड जनावरांची खरेदी-विक्री करण्यावर केंद्र सरकारने बंदी आणली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
COMMENTS