यंदा बैलगाडी शर्यतीला परवानगी नाहीच – मुंबई हायकोर्ट

यंदा बैलगाडी शर्यतीला परवानगी नाहीच – मुंबई हायकोर्ट

मुंबई – यंदा बैलगाडी शर्यत घेण्यास परवानगी मिळणार नाही असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय. त्यामुळे यंदा राज्यात कुठेही बैलगाडी शर्यत सुरू होणार नाही. जोपर्यंत शर्यतीदरम्यान बैलांना इजा होणार नाही यासाठी सरकार नियम बनवत नाही तोपर्यंत बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली जाणार नाही असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय. त्यामुळे बैलगाडी शर्यतीच्या शेतक-यांचा हिरमूड झाला आहे. सरकार आता त्यावर नियम कधी बनवते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS