शिवसेना नेत्याला दोन महिन्यांचा कारावास

शिवसेना नेत्याला दोन महिन्यांचा कारावास

यवतमाळ – महावितरण अधिकाऱ्याला चप्पलने मारहाण केल्या प्रकरणी शिवसेना महिला आघाडीच्या विद्यमान जिल्हा संघटिका लता चंदेल यांना दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  यवतमाळ सत्र न्यायालयाने आज (दि.10) चंदेल यांना शिक्षा सुनावली.

शहर उपविभागीय कार्यालयामध्ये 13 डिसेंबर 2013 रोजी शिवसेना कार्यकर्ते आणि नगरसेवक भारनियमनावर चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका लता चंदेल सुद्धा तेथे उपस्थित होत्या. यवतमाळमधील भोसा भागातील भारनियमनाला सहअभियंता श्रीराम साठे हे जबाबदार आहेत, असा आरोप करुन रागाच्या भरात लता चंदेल यांनी पायातील चप्पल काढून साठे यांना मारले होते. या प्रकरणी वडगाव पोलिसात लता चंदेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे गंभीर प्रकरण न्याय प्रविष्ट झाल्यानंतर या प्रकरणात ६ साक्षीदारांच्या साक्षीने लता चंदेल यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला, त्यानंतर प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोन महिने तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

COMMENTS