यवतमाळ: गेल्या काही दिवसांपासून खासदार पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा व महागाईवर त्यांनी दोन्ही सरकारांना जबाबदार धरले असून या दोन्ही सरकारांवर ताशेरे ओढण्याची संधी दवडली नाही. केंद्र व राज्य सरकारची दोन हात केले जात आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील टिटवी (ता. घाटंजी) येथे जाऊन महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचे जाहीर केल्याने सर्वाचं लक्ष या टिटवी भेटीकडे लागले होते. मात्र यावेळी कोणतीही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याच आली नाही. ‘शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण राज्यभर दौरे करणार असून. शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी वेळप्रसंगी खासदारकीचा राजीनामा देईल असेही पटोले म्हणाले.
घाटंजी तालुक्यातील टिटवी गावात मोदी सरकार व कर्जबाजारी पणाला कंटाळून युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. प्रकाश उर्फ बाळू माणगावकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आज भाजप खासदार नाना पटोले यांना घेतली. टिटवी येथील माळगावकर या शेतकऱ्यांने आत्महत्येपूर्वी एक संदेश लिहून ठेवला होता. गळफास घेतलेल्या दोराजवळ झाडाच्या 2 पानावर त्याने चुन्याच्या सहाय्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. त्यामध्ये मोदी सरकार आणि कर्जासाठी आत्महत्या असा उल्लेख केल्याचे आढळले होते. प्रकाश माणगावकर यांच्यावर 1 लाख रुपयाचे पीककर्ज होते तर 2 लाखाचे खासगी कर्ज त्याचावर होते. यावेळी खासदार पटोले यांनी मानगावकर कुटुंबाला 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. या दौऱ्यात मात्र भाजपचा एकही कार्यकर्ता दिसले नाही.
COMMENTS