यवतमाळ – सदाभाऊ खोत यांच्यावर कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न

यवतमाळ – सदाभाऊ खोत यांच्यावर कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न

यवतमाळ – पिकांवर किटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे कळंब येथील 19 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यवतमाळमध्ये आले असता यांच्यावर आज कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न झाला. फवारणीचा प्रयत्न करणाऱ्या सिकंदर शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  यावेळी सदाभाऊ खोत यांना शेतकरी प्रतिनिधींनी घेराव घालत सदाभाऊ खोत हाय हायच्या घोषणाही देण्यात आल्यात.

यवतमाळमध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांवर कीटकनाशक फवारणीच्या वेळीस 19 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर 750 हून अधिक शेतकरी उपचार घेत आहेत. यवतमाळमधील या घटनेनंतर शेतकरी संघटनांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांवर टीका केली होती. शेतकऱ्यांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केलाय.

कीटकनाशक फवारणीप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बुधवारी यवतमाळमध्ये आले होते. यादरम्यान त्यांच्यावर कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न झाला. पोलिसांनी फवारणीचा प्रयत्न करणाऱ्या सिकंदर शहाला ताब्यात घेतले आहे. कीटकनाशक फवारणीमुळे एवढ्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हा प्रयत्न केल्याचे सिकंदर शहाचे म्हणणे आहे.

COMMENTS