मुंबई – औषध कंपन्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कारण्यात येणार आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. यवतमाळमध्ये विषारी औषध फवारणी केल्याने सुमारे 35शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
कृषी औषधांना परवानगी देणारे आणि औषध विक्रीची तपासणी करण्याची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई होत आहे. यासंदर्भात दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच कृषी अधिकाऱ्यांसाठी काही नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
COMMENTS