यवतमाळ – कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या ताफ्यावर शेतकऱ्यानी कापसाच्या फांद्या फेकल्या आहे. कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या उद्रेकाचा सामना करावा लागला.
माणोली येथे मृतकाच्या घरी भेटी दरम्यान बाजू ऐकून न घेतल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कृषीमंत्री फुंडकर यांच्या ताफ्यावर शेतकऱ्यानी कापसाच्या फांद्या फेकल्या. पालकमंत्री मदन येरावार आणि शेतकरी नेत्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाली. मदन येरावार व कृषी मंत्र्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पिकांवर किटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे कळंब येथील शेतमजुराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यातील 18 शेतमजुरांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे.
COMMENTS