“या” शेतक-यांना मिळणार नाही कर्जमाफी ?

“या” शेतक-यांना मिळणार नाही कर्जमाफी ?

राज्य सरकारचा मंत्रिगट आणि शेतकरी सुकाणू समिती यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये काल शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी सरकारने तत्वतः मान्यता दिली असं जाहीर करण्यात आलं. सर्वच नेत्यांनी काल सरसकट आणि तत्वतः असे शब्दप्रयोग केले. यावरुन सर्वच शेतक-यांना कर्जमाफी मिळणार नाही हे स्पष्ट आहेच. कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ती समिती कर्जमाफीचे निकष ठरवल्यानंतर कोणाला कर्जमाफी मिळणार आणि कोणाला कर्जमाफी मिळणार नाही हे स्पष्ट होईलच. सूत्रांच्या माहितीनुसार कर्जमाफीच्या निकषाबाबत सरकारच्या डोक्यात काय आहे याचा हा अंदाज….

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणाला कर्जमाफी मिळणार नाही ते पाहूयात……

जे शेतकरी नोकरी करतात आणि आयकर भरतात अशा शेतक-यांना कर्जमाफी मिळणार नाही

जे शेतकरी व्यवसाय करतात आणि  ज्यांचे उत्पन्न ठरावीक रकमेपेक्षा जास्त आहे अशांनाही कर्जमाफी मिळणार नाही

ज्या शेतक-यांचे शेतीमधील उत्पन्न चांगले आहे, थोडक्यात सधन शेतक-यांनाही कर्जमाफी मिळणार नाही

अल्पभूधारक शेतक-यांच्या घरात कोणी नोकरीला असेल किंवा त्याचे मिळकतीचे इतर काही स्त्रोत असतली तर त्यांनाही कर्जमाफी मिळणार नाही

अशा पद्धतीने कर्जमाफीतून या शेतक-यांना वगळले जाऊ शकते. त्यामुळेच कर्जमाफी कशापद्धतीने आणि कुठल्या शेतकऱ्यांची करायची, त्याचे निकष काय असावेत यासाठी सरकारने नव्या समितीची स्थापना केली आहे.

COMMENTS