लखनऊ – उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार विविध कारणांनी सातत्याने चर्चेत आहे. आता सरकारनं घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे ते चर्चेत आलेत. कुटुंबनियोजनासाठी एक हटके योजना सरकारनं पुढे आणली आहे. त्यामध्ये नवविवाहीत जोडप्यांना लग्नाचा आहेर म्हणून एक किट भेट दिलं जाणार आहे. या किटमध्ये गर्भनिरोध गोळ्या आणि कंडोमचा समावेश असणार आहे. येत्या 11 जुलैपासून म्हणजेच लोकसंख्यादिनापासून या योजनाची सुरूवात होणार आहे. या किटमधून लोकांमध्ये जनजागृतीही केली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबांनं आपलं कुटुंब हम दो हमारे दो असं ठेवावं अशी अपेक्षा या योजनेमागं आहे. आता ही हटके योजना उत्तर प्रदेशात लोकसंख्येला किती आळा घालते हे पाहण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.
COMMENTS