येळकोट…  येळकोट जय मल्हार च्या निनादात दुमदुमली सोन्याची जेजुरी नगरी…

येळकोट… येळकोट जय मल्हार च्या निनादात दुमदुमली सोन्याची जेजुरी नगरी…

जेजुरीला आले सोन्याचे रुप..

लाखो भाविकांनी लावली जेजुरीत हजेरी..

आज सोमवती अमावस्या त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून लाखो भाविकांनी जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे , दोन दिवसांपासुनच लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती… आज दुपारी 1 वाजता पालखी सोहळा सुरु झालेला सायंकाळी 5  वाजता पालखी सोहळा  “कऱ्हा”तीरी पोचेल आणि त्याठिकाणी  येळकोट येळकोट जयमल्हार’, “सदानंदाचा येळकोट’ असा खंडोबाचा जयघोष करीत व भंडारा-खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करीत “कऱ्हा “ तीरावर लाखो भक्तांच्या साक्षीने  , “खंडोबा आणि म्हाळसा” यांना अंघोळ घालण्यात आली …..

जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्रच लोकदैवत…अठरापगड जाती जमाती यांचे कुलदैवत , या खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महतवाची म्हणजे हि सोमवती अमावस्या, या यात्रेमुळे २ दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत प्रचंड गर्दी वाढली होती , लाखो भाविक जेजुरीत आलेले आहेत अजुनही येतच आहेत , आज दुपारी 1  वाजता गडावरून पालखी निघून मुख्य मार्गाने धालेवाडी रस्त्याने ७ किलो मीटर वर असणाऱ्या कऱ्हा नदी तीरी सायंकाळी 5 वाजता  दाखल झाला ., या कऱ्हेला पवित्र स्थान आहे , नदी तीरावर पालखी   रंभाई मंदिरा शेजारी विसावुन  , नन्तर लाखो भाविकांच्या साक्षीने भंडार्याच्या उधळणीत देवाला कऱ्हा स्नान घालण्यात आले   आणि नन्तर देवाचा पालखी सोहळा गडाकडे पुन्हा रवाना झाला ..

 

COMMENTS