मुंबई – बोनस जाहीर न झाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी भाऊबीजेला (21 ऑक्टोबर) एक दिवसाचा संप पुकारला आहे. 21 ऑक्टोबरला बेस्टच्या बसेस संपूर्णत: बंद राहणार आहेत. बेस्टचे 32 हजार कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यामुळे बेस्टच्या 3800 बसपैकी एकही बस रस्त्यावर धावणार नाही. 30 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत.
बोनस जाहीर न झाल्यास 18 तारखेपासून 21 पर्यंत बेस्ट संयुक्त कृती समितीचे नेते उपोषणाला बसणार आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर न झाल्यामुळे बेस्ट संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला आहे. रक्षाबंधनप्रमाणचे भाऊबीजेलाही बेस्ट बसेस रस्त्यावर धावणार नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवसातमुंबईकरांचे हाल होणार आहे.
COMMENTS