रजनीकांत आणि पूनम महाजन भेटले, काय झाली चर्चा ?

रजनीकांत आणि पूनम महाजन भेटले, काय झाली चर्चा ?

चेन्नई – अभिनेते रजनीकांत यांची तमिळनाडूत भाजयुमोच्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी भेट घेतली. रविवारी झालेल्या या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे भाजपकडून स्पष्ट केले जात असले तर रजनीकांत भाजपात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा जोरात सुरू आहे. ही भेट रजनीकांत यांच्या निवासस्थानी झाली होती.

तमिळनाडूत बस्तान बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला रजनीकांतच्या माध्यमातून पक्षाचा पाया मजबूत करायचा आहे. आता रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करतील की अन्य पक्षात जातील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

COMMENTS