फेसबूकचा प्रमुख मार्क झकरबर्ग सध्या जगात विविध देशांना भेटी देत आहे. त्याच्या या दौ-यावरुन विविध तर्कवितर्क लावले हात आहेत. अमेरिकेतील पुढच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी तो जगभरात विविध देशांचा दौरा करत असल्याचं बोललं जातंय. मात्र या चर्चांना खुद्द मार्कनं पूर्णविराम दिलाय. त्यानं फेसबूकवर पोस्ट टाकून या दौ-यामागचं कारण सांगितलं आहे. जगभरातील लोकांच्या भेटी घेऊन त्यांची मतं आजमावून घेत आहे. जगातील विविध ठिकाणची संस्कृती, त्यांचे आचार विचार पूर्णपणे वेगळे आहेत. ते समजून घेण्यासाठी जगभरात फिरत असल्याचं त्यानं सांगितलं आहे. या भेटीतून मिळालेल्या माहिती आणि ज्ञानातून फेसबूकमध्ये योग्य ते बदल करता येतील यासाठी हा दौरा असल्याचं मार्कनं त्या फेसबूक पोस्टमध्ये सांगितलं आहे.
COMMENTS